Search
Close this search box.

केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी साधला नागपूरमधील जिल्हा परिषद प्रशालेतील विद्यार्थ्यांशी संवाद

नागपूर, दि. ४ एप्रिल – जिल्ह्यातील थुगांव (निपाणी) येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी मंगळवारी (दि. ४ एप्रिल) केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देत श्री गडकरीजी यांनी त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विद्यार्थ्यांमध्ये वेगळाच उत्साह होता. विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील कामकाज तसेच श्री गडकरीजी यांच्या विभागाविषयी व ते करत असलेल्या अनेक प्रकारच्या सामाजिक कार्याविषयी माहिती घेतली.


“जीवनात यशस्वी होण्यासाठी परिश्रम व अभ्यासाला पर्याय नाही. शिक्षणाचा पाया मजबूत झाला, तरच तुम्ही कोणत्याही क्षेत्रात मजबूतपणे उभे राहू शकता. नेहमी यश मिळतेच असे नाही, त्यामुळे अपयश आले म्हणून खचून न जाता त्यातून प्रेरणा घेऊन पुढे जाता आले पाहिजे,” अशा प्रकारे श्री गडकरीजी यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांसोबतच शाळेचे मुख्याध्यापक धनंजय पकडे, सहाय्यक शिक्षक निलेश सहकार, संदीप बागडे आणि केंद्र समन्वयक राजेंद्र टेकाळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article