Search
Close this search box.

सुरक्षित रस्ते वाहतूक उपायोजनांसाठी शासन कटिबद्ध – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. २ एप्रिल – “रस्ते अपघात ही आपल्या देशाला भेडसावणारी मोठी समस्या आहे. ती सोडण्यासाठी सर्वांनीच मिळून प्रयत्न करण्याची गरज आहे. भारतातील रस्ते अधिक सुरक्षित करण्यासाठी शासन कटिबद्ध असून यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. दरम्यान, कल्पना टॉकीज स्क्वेअरवरील टॅक्टिकल अर्बनिझम (टीयु) चाचणीचा अहवाल परिणामकारक आल्यास या तंत्रज्ञानाची अंमलबजावणी संपूर्ण भारतात करण्यात येईल,” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

शहरातील कल्पना टॉकीज चौक या परिसरात सुरक्षित वाहतुकीसंबंधित उपाययोजना म्हणून २०१९ आणि २०२२ दरम्यान ‘टॅक्टिकल अर्बनिझम’ (टीयु) या तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यात आली. कल्पना टॉकीज स्क्वेअर टॅक्टिकल अर्बनिझम (टीयु) चाचणी स्थळाला रविवारी (दि. दि. २ एप्रिल) श्री गडकरीजी यांनी भेट देऊन त्याविषयी माहिती घेतली. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नागपूर महानगरपालिका, नागपूर वाहतूक पोलीस, एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स आणि सेव्हलाइफ फाऊंडेशन (एसएलएफ) यांच्या माध्यमातून ही चाचणी घेण्यात आली.

मानकापूर इनडोअर स्टेडियम चौक या नावानेही ओळखला जाणारा कल्पना टॉकीज चौक कायम वर्दळीचा आणि उत्तर दिशेचे नागपूरचे प्रवेशद्वार असल्याने वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा भाग आहे. याशिवाय, नागपूर शहरातील राष्ट्रीय महामार्ग ४७ वरील तसेच छिंदवाडा आणि वर्धा शहरांना जोडणारा हा चौक आहे. जय हिंद नगररोड, न्यू मानकापूर रोड, राज्य महामार्ग २६० आणि रेल्वे लाईनला येथून रस्ते जातात. दरम्यान, प्रादेशिक मेंटल हॉस्पिटल आणि कल्पना टॉकीज स्क्वेअरदरम्यान २०१९ आणि २०२२ दरम्यान एकूण १३ अपघात झाले, त्यापैकी पाच प्राणघातक होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article