Search
Close this search box.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हेच संघटनेचे कर्तव्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हेच संघटनेचे कर्तव्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १ मे – “असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या हिताच्या रक्षणासाठी आणि त्यांना न्याय देण्याचे काम युवा मजदूर फाउंडेशनद्वारे करण्यात येते. भारतीय जनसंघाचे संस्थापक पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास सामाजाची सेवा करण्याचा विचार दिला आहे. त्याच विचारावर संघटनेचे काम सुरू आहे. शोषित कामगारांच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करत राहणे, हे संघटना म्हणून आपले कर्तव्य आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

कामगारांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष करणे हेच संघटनेचे कर्तव्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

युवा मजदूर फाउंडेशनद्वारे जरीपटका येथील एमआयटी ग्राउंड येथे सोमवारी (दि. १ मे ) मजदूर महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी बोलत होते. याप्रसंगी भाजप नागपूर शहराध्यक्ष प्रवीणजी दटके, संघटन महामंत्री श्री उपेंद्रजी कवठेकर, श्री संजय जी भेंडे, श्री विकीजी कुकरेजा, श्री मिलिंदजी माने संघटनेचे पदाधिकारी आणि कामगार बांधव उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “औद्योगिक क्षेत्रात कामगारांचे शोषण होत असल्यास त्याला न्याय मिळवून देण्याचे काम आपले आहे. याचसोबत उद्योग व्यवसाय वाढून अधिकाधिक कामगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. ज्यामुळे गरिबी दूर करण्याचे आपले मिशन साध्य होऊ शकेल. नोकरी मागणाऱ्यांसोबतच नोकरी देणारे बनण्याचा प्रयत्न सर्वांनीच करायला हवा. ज्यामुळे आपले आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार होऊ शकेल. आपल्या विश्वाचे कल्याण व्हावे, यासाठी सर्व भारतीय प्रयत्न करतात. कारण ‘सर्वे सुखिनः सन्तु’ ही आपली भारतीय संस्कृती आहे. शोषित, गरीब, कामगार या सर्वांना हक्काचे घर, रोजगार, चांगल्या दर्जाचे शिक्षण, पोषक आहार आणि जीवनावश्यक सुविधा मिळायला हव्या. उत्तर नागपूरमधील गरीब गरजू रुग्णांसाठी अद्ययावत रुग्णालय लवकरच तयार करण्याचा प्रयत्न आहे. ज्यामुळे १००० रुपयांत एमआरआय, ५०० रुपयांत सिटी स्कॅन तसेच ५०० रुपयांत डायलेसिससारख्या महागड्या आरोग्य सुविधा कमी खर्चात उपलब्ध होतील. गरिबांची प्रामाणिकपणे सेवा करणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. तसेच जात, पंथ, धर्म, भाषा यावरून कधीच भेदभाव केला जाणार नाही. कोणतीही व्यक्ती तिच्या धर्म, पंथ, भाषेमुळे नव्हे तर व्यक्तीच्या गुणांमुळे मोठी बनते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article