नागपूर, दि. १६ एप्रिल – नागरिकांच्या अडी-अडचणी जाणून घेऊन त्या तातडीने सोडविण्याच्या उद्देशाने केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या नागपूर येथील खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात रविवारी (दि. १६ एप्रिल) ‘जनसंपर्क’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री गडकरीजी यांनी राज्यभरातून आलेल्या नागरिकांच्या समस्या जाणून घेऊन अनेकांच्या अडचणी तात्काळ सोडविल्या, तर काहींसाठी आवश्यक शासकीय प्रक्रिया लवकर पूर्ण करून त्या मार्गी लावण्याच्या सूचना संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. नागपूरसह राज्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


सर्वसामान्य नागरिकांना एकाच ठिकाणी अडी-अडचणी मांडता याव्यात आणि त्या सोडविण्यासाठी तातडीने योग्य ती कार्यवाही करता यावी, या उद्देशाने ‘जनसंपर्क’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. तसेच त्यांची वेळेत कामे होऊन शासकीय कार्यालयांमध्ये होणारी पायपीटदेखील टळते. रविवारी आयोजित ‘जनसंपर्क’ उपक्रमात निवृत्तीवेतनाचे प्रश्न, शाळा व महाविद्यालयातील प्रवेश, आरोग्यविषयक समस्या, मदतीची मागणी, संशोधन, लेखन कार्य, अनुकंपा तत्त्वावरील नोकरी, अतिक्रमण हटवणे यासह विविध समस्यांची निवेदने घेऊन सर्व स्तरातील नागरिक सकाळपासूनच मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री गडकरीजी यांनी सुरुवातीला कार्यालयाबाहेर मंडपात थांबलेल्या दिव्यांग, ज्येष्ठ नागरिकांना प्राधान्य देत त्यांच्या अडी-अडचणी व समस्या जाणून घेत त्या सोडविल्या. त्यानंतर उपस्थित इतर नागरिकांची निवेदने स्वीकारून त्यांचे म्हणणे ऐकून घेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन केले.





One Response
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you. https://www.binance.bh/futures/ref?code=QCGZMHR6