नोकरी मागणारे नाही, देणारे व्हा : श्री नितीन गडकरी
नोएडातील गलगोटिया विद्यापीठाच्या दीक्षांत सोहळ्यात श्री गडकरीजींचा डी.लिट देऊन सन्मान

नोएडा (उत्तर प्रदेश) – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांना नोएडा येथील गलगोटिया विद्यापीठाच्या ७व्या दीक्षांत समारंभात डॉक्टर ऑफ लिटरेचर (डि.लिट.) ची मानद पदवी प्रदान करण्यात आली. सार्वजनिक सेवा आणि राष्ट्र उभारणीत दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना ही मानद डॉक्टरेट बहाल करण्यात आली. डि.लिट. पदवीचा विनम्रपणे स्वीकार करत त्यांनी यावेळी विद्यापीठाचे आभार मानले.

गलगोटिया विद्यापीठाचे कुलपती श्री सुनील गलगोटिया जी, दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती जे.आर मीना जी, प्र-कुलगुरू श्रीमती पद्मिनी गलगोटिया जी, सीईओ श्री ध्रुव गलगोटिया जी, संचालक आराधना गलगोटिया जी आणि कुलगुरू प्रा. मल्लिकार्जुन बाबू जी यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालक यावेळी उपस्थित होते.

इथेनॉल, मिथेनॉल, बायो इथेनॉल, बायो-सीएनजी, बायोडिझेल, बायो-एलएनजी, ग्रीन हायड्रोजन आणि इलेक्ट्रिक हेच भविष्यातील इंधन आहे. ऊर्जा आयात करणारे राष्ट्र होण्यापासून आपण ऊर्जा निर्यात करणारे राष्ट्र बनले पाहिजे. आपल्याला फक्त धान्य पुरवठादार राहून चालणार नाही, शेतकऱ्यांना वीज पुरवठादार बनवण्याची गरज आहे. यासाठी आवश्यक भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी देशातील तरुण, प्रतिभावान अभियंतांनी पुढाकार घेण्याचे आवाहन यावेळी श्री गडकरीजी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *