नागपूर, दि. २० जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘खासदार क्रीडा महोत्सवां’तर्गत शुक्रवारी (दि. २० जानेवारी) पार्डी येथील भवानी माता मंदिर मैदानावर कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री गडकरीजी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांनी उपस्थित नागरिकांशी व खेळाडूंशी संवाद साधला. खेळाडूंना मार्गदर्शन केले व त्यांचा उत्साह वाढवला. चांगले व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी खेळाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. सर्व खेळाडूंना प्रोत्साहन देणे, व्यासपीठ मिळवून देणे आणि खेळाप्रती आवड निर्माण करणे, हाच खासदार क्रीडा महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवाचे हे पाचवे वर्ष आहे.