Search
Close this search box.

बॉक्सिंग स्पर्धास्थळी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांची भेट, खेळाडूंचा वाढवला उत्साह

नागपूर, दि. २० जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गडकरीजी यांनी शुक्रवारी (दि. २० जानेवारी) गांधीबाग उद्यान मैदानावर सुरू असलेल्या बॉक्सिंग स्पर्धास्थळी भेट दिली.

यावेळी श्री गडकरीजी यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थितांशी व खेळाडूंशी संवाद साधला व त्यांचा उत्साह वाढवला. या महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळणार आहे. पुढे जाऊन ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवतील. याशिवाय, ऑलम्पिकपर्यंत जाऊन नागपूरसह देशाचेही नाव पुढे नेतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article