संचालक मंडळाची विश्वासार्हता संस्थेचे खरे भांडवल – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

संचालक मंडळाची विश्वासार्हता संस्थेचे खरे भांडवल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर – संचालक मंडळ आणि पदाधिकाऱ्यांची  विश्वासहार्यता हे संस्थेचे खरे भांडवल असते, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.

संचालक मंडळाची विश्वासार्हता संस्थेचे खरे भांडवल - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

दि धरमपेठ महिला मल्टी स्टेट को-ऑप सोयायटीच्या शिवाजी नगर येथील मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ना. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते. व्यासपीठावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, महाराष्ट्र अर्बन को-ऑप बँक्स फेडरेशनच्या उपाध्यक्ष वैशाली आवाडे, निवृत्त न्यायमूर्ती वासंती नाईक, माजी आ. डॉ. परिणय फुके, धरमपेठ महिला संस्थेच्या अध्यक्ष निलिमा बावणे, उपाध्यक्ष किशोर बावणे व सारिका पेंडसे यांची उपस्थिती होती. धरमपेठ महिला संस्थेच्या प्रगतीमध्ये बावणे दाम्पत्याचे खूप मोठे योगदान असल्याचाही ना. गडकरी यांनी उल्लेख केला. ‘ज्या संस्थांमधील पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी संस्थेच्या हितासाठी कार्य केले त्या संस्थांनी  उंच शिखर गाठले आहे. धरमपेठ महिला संस्थेने आपल्या कार्यप्रणालीने हे सिद्ध केले आहे,’ असेही ना. गडकरी म्हणाले.

 मुख्य कार्यालयाच्या नवीन वास्तूचे रविवारी उद्घाटन झाले. यावेळी ना. नितीन गडकरी अध्यक्षस्थानी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *