राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते उद्घाटन

राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती

नागपूर, दि. १ एप्रिल – नागपूर महापालिकेच्या वतीने २१४ लाख रुपये खर्चून आधुनिक सोयीसुविधांनी युक्त अशा राजर्षी छत्रपती शाहू महाराज ई-ग्रंथालयाची उभारणी करण्यात आली आहे. त्याचे उद्घाटन शनिवारी (दि. १ एप्रिल) केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते चिटणवीसपुरा येथे पार पडले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.

“अनेक आधुनिक सुविधांनी युक्त हे ई-ग्रंथालय युवकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी आणि ती वृद्धिंगत करण्यासाठी उपयुक्त ठरेल,” असे मत यावेळी श्री गडकरीजी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी आमदार श्री विकास कुंभारे, आमदार श्री प्रवीण दटके, आमदार श्री मोहन मते तसेच इतर मान्यवरांसह महापालिका अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. चार मजली इमारत असलेल्या या ई-ग्रंथालयात मुला-मुलींसाठी स्वतंत्र संगणक कक्ष, अभ्यासिका, ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, वाचन कक्ष, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची सोय आदी सुविधा असणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *