नागपूरची कार्बन न्यूट्रल इकॉनॉमीच्या दिशेने वाटचाल सुरू – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १९ मार्च – “महापालिकेच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या इलेक्ट्रिक बसमुळे शहरातील वाढणाऱ्या प्रदूषणाला काही प्रमाणात आळा बसणार आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने ही नव्या युगाची सुरुवात असून कार्बन न्यूट्रल इकॉनॉमीच्या दिशेने शहराची वाटचाल आता सुरू झाली आहे. या बसेस वातानूकुलित आणि आरामदायी असल्यामुळे नागपूरकरांचाही प्रवास सुखद होणार आहे. प्रदूषणापासून मुक्तता मिळवण्यासाठी नागपूर महापालिकेने भविष्यकालीन तंत्रज्ञानासाठी घेतलेला हा पुढाकार कौतुकास्पद आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

स्मार्ट सिटी अंतर्गत नागपूर महापालिकेला मिळालेल्या इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण श्री गडकरीजी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. नागपूर येथील संविधान चौक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते. यावेळी आमदार श्री कृष्णा खोपडे जी, आमदार श्री प्रवीण दटके जी, पालिका आयुक्त श्री बी. राधाकृष्णन जी आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “अपंग आणि दिव्यांगांना बसमध्ये चढताना व उतरताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांचाही प्रवास सुखद होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. असे झाल्यास त्यांनादेखील कोणाच्याही मदतीशिवाय प्रवास करणे शक्य होणार आहे. ‘व्हेईकल स्क्रॅपिंग पॉलिसी’मुळे रस्त्यावरील चालवण्यायोग्य नसणारी सर्व वाहने कमी होणार आहेत. यामुळे प्रदूषण रोखण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पंधरा वर्षे पूर्ण झालेली सर्व शासकीय वाहने स्क्रॅप करणे गरजेचे आहे.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *