नागपूर, दि. १९ मार्च – नागपूर महापालिकेतर्फे मौजा वांजरा येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या मागास घटकांसाठी घरकुल बांधण्यात येत आहेत. या घरकुलाचे भूमिपूजन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस उपस्थित होते.
खाजगी सार्वजनिक भागीदारी (पीपीपी) तत्त्वावर राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पातील सदनिका आर्थिकदृष्ट्या मागास घटकांमधील नागरिकांसाठी जवळपास ९ लाख रुपयात घरे उपलब्ध होणार आहेत. या प्रकल्पाचे काम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रकल्पात ७ मजल्याच्या ८ इमारती व वाहनतळ असणार आहे. या योजनेमुळे गरीब आणि वंचितांना हक्काची घरे मिळणार असून त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. यावेळी आमदार श्री कृष्णा खोपडे जी, पालिका आयुक्त श्री बी. राधाकृष्णन जी आदी मान्यवर उपस्थित होते.