केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने दुसऱ्या दिवसाची सुरुवात
‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सव’
नागपूर, दि. ४ फेब्रुवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून दि. ३ ते ५ फेब्रुवारीदरम्यान रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृह येथे ‘खासदार ज्येष्ठ नागरिक सांस्कृतिक महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, श्री गडकरीजी आणि उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून महोत्सवाच्या दुसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमांची सुरुवात झाली.
नागपूर येथील ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी (दि.४) सुप्रसिद्ध पार्श्वगायक श्री नितीन मुकेश जी यांच्या गायनाचा कार्यक्रम झाला. यापूर्वी श्री गडकरीजी यांच्या हस्ते श्री मुकेशजी यांचा पुष्पगुच्छ आणि शाल देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर श्री मुकेशजी यांनी आपल्या गायनाला सुरुवात केली. त्यांनी सादर केलेल्या गीतांनी नागपूरकर मंत्रमुग्ध झाले व भरभरून दाददेखील दिली. महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती लावली होती.