नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये ८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज श्री नितीनजी गडकरी यांनी शहरातील विवेकानंद नगर येथील इनडोअर मैदानावर सुरू असलेल्या कराटे स्पर्धास्थळी भेट दिली.
या वेळी श्री गडकरीजी यांनी कराटे स्पर्धेत सहभागी सर्व खेळाडूंशी संवाद साधला. स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना या वेळी श्री गडकरीजी यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले.