नागपूर, दि. ८ जानेवारी – “बस्तर मित्र मंडळ आणि भारतीय कुष्ठ निवारक संघाने नक्षल प्रभावित भागात आदिवासी समाजाच्या उद्धारासाठी मोठे कार्य केले आहे. यात त्यांना मोठ्या अडचणींचा सामनादेखील करावा लागला. मात्र, न डगमगता यातून मार्ग काढत तसेच आदिवासी बांधवांच्या मदतीने त्यांच्यातील कौशल्य विकासासाठी मोठे काम केले आहे. त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे,” असे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील भारतीय कुष्ठ निवारक संघाच्या वतीने नक्षत्र सेलिब्रेशन हॉल येथे आयोजित रजत महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री दिलीपजी गुप्ता होते. यावेळी संस्थेचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.
श्री गडकरीजी म्हणाले, “भारतीय कुष्ठ निवारक संघाने नक्षल प्रभावित भागातील आदिवासी मुलांना चांगले शिक्षण मिळवून देत समाज्याच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले आहे. त्यांच्यावर योग्य संस्कार करत रोजगाराच्या दृष्टीने त्यांच्यातील कौशल्य विकासावर भर दिला. याशिवाय, त्यांना आरोग्याच्या चांगल्या सुविधाही उपलब्ध करून देण्याचे काम संस्थेकडून करण्यात येत आहे. या प्रयत्नांमुळे आज आदीवासी भागात मोठ्या प्रमाणात परिवर्तन झाल्याचे दिसून येत आहे.”