नागपूर, दि. ७ जानेवारी – “सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, उपलब्ध कच्चा माल आणि विक्री योग्यता या चार गोष्टी यशस्वी व्यवसायासाठी महत्त्वाच्या असतात. त्याचसोबत प्रामाणिकपणा, विश्वासार्हता, सद्भावना, पारदर्शकता, निर्णय क्षमता आणि सचोटी हेदेखील तेवढेच आवश्यक आहेत. तर उद्योग, स्टार्टअप यांच्यासाठी मिळणाऱ्या सुयोग्य आर्थिक नेतृत्त्वाच्या मदतीने आपण यश संपादन करू शकतो. यातून प्राप्त होणारी विश्वासार्हता आपल्यात सकारात्मकता आणि लोकांच्या मनात आपल्याविषयी विश्वास निर्माण करते,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.
नागपूर येथील मनी बी इन्स्टिट्यूट द्वारे आयोजित ‘अमृतकाल : व्हिज्युअलायझिंग इंडिया @१००’ या विषयावरील कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी डॉ. अपूर्वजी शर्मा, श्री विशेषजी खुराणा, शिवानीजी धानी वखरे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.