चमत्कार दाखवल्याशिवाय कोणीही नमस्कार करत नाही : केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी

नागपूर, १३ नोव्हेंबर – भारतीय संस्कृतीतील आयुर्वेद, पंचकर्म आणि चिकित्सा पद्धतींप्रती संपूर्ण विश्वाला उच्छुकता आणि आदर आहे. जर आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे आपण ती संपूर्ण विश्वात पोहोचवू शकतो. कारण चमत्कार दाखवल्याशिवाय कोणीही नमस्कार करत नाही. लोक तेव्हाच आदर देतात जेव्हा त्यांना सकारात्मक परिणाम मिळतात. त्यामुळे ज्ञानाप्रती समर्पित होऊन विश्वासमोर आपल्या आयुर्वेदाला नेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी केले.

आयुर्वेद व्यासपीठ, नागपूरच्या रजत जयंती समारोप समारोह आणि आंतरराष्ट्रीय संगोष्ठी कार्यक्रमास केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी उपस्थित होते. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी श्री डॉ. जयंत देवपुजारी, केंद्रीय अध्यक्ष डॉ. अंजली गोखले, संस्थापक अध्यक्ष विनय वेलणकर, आदी उपस्थित होते.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, ज्ञान हे मोठी शक्ती आहे. ज्ञानाप्रती आपण समर्पित व्हायला हवं. सतत अभ्यास करायला हवा. कोणतं तंत्रज्ञान सर्वोत्तम आहे, याचा अभ्यासकरून निदानासाठी त्याचा कसा उपयोग होईल याचा विचार होणे आवश्यक असल्याचेही केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणले. विश्वसनीयता टिकून ठेवण्याचा प्रयत्न होणे आवश्यक आहे. हे महत्वाचे आहे. याला कुठलाही शॉर्ट कट नाही. आयुर्वेदाची पदवी असेल तर त्याच क्षेत्रात प्रॅक्टिस करणे गरजेचे आहे. हि आपल्या व्यवसायाशी, क्षेत्राशी असणारी आपली एकनिष्ठता आहे. आपलाच आपल्या पॅथीवर विश्वास नसेल तर लोकांना कसा बसेल. त्यामुळे आपल्या क्षेत्रावर विश्वास ठेऊन काम करा. ‘सर्वे सन्तु निरामया’ या उक्ती प्रमाणे लोकांना निरामय आयुष्य मिळवून देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत, आणि तसंच काम आपण केलं पाहिजे, असा सल्ला यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *