माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्याकडून कामाचा आढावा
नागपूर, दि. २ डिसेंबर – जगातील सर्वांत मोठे दिव्यांगांसाठीचे विशेष उद्यान नागपुरात तयार करण्यात येणार असल्याची घोषणा माननीय केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केली होती. त्यानुसार उद्यानाच्या कामाबाबतचा आढावा गुरुवारी त्यांनी अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या बैठकीत घेतला. लवकरच या दिव्यांग उद्यानाचे भूमिपूजन होणार आहे.
यावेळी खासगी सचिव संकेत भोंडवे, रितेश यादव उपस्थित होते. श्री गडकरीजी यांच्या प्रयत्नातून तयार करण्यात येणाऱ्या या उद्यानात दिव्यांगांसाठी अनुकूल अशा २१ प्रकारच्या सुविधा असणार आहेत. यात स्पर्श आणि गंध उद्यान, हायड्रोथेरपी युनिट, वॉटर थेरपी, गतिमंद मुलांसाठी स्वतंत्र खोली अशा सुविधा असतील. या प्रकल्पामुळे दिव्यांगांना चांगल्या दर्जाच्या सुविधा उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.