Search
Close this search box.

निःशुल्क नेत्र व कर्ण रोग तपासणीला नागरिकांचा प्रतिसाद

निःशुल्क नेत्र व कर्ण रोग - नागपूर

स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेचा उपक्रम : वस्त्यांमध्ये फिरतेय मोबाईल व्हॅन

नागपूर – स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नागपुरमधील सर्वसामान्य जनतेसाठी निःशुल्क नेत्र व कर्ण रोग तपासणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. शहरातील विविध वस्त्यांमधील नागरिकांचा या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.


संस्थेच्या वतीने एक मोबाईल व्हॅन शहरातील विविध वस्त्यांमध्ये फिरत आहे. यामध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या माध्यमातून निःशुल्क नेत्र व कर्ण रोग तपासणी केली जात आहे. केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून गोरगरीब जनतेला त्यांच्या वस्तीमध्ये सेवा मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आज (सोमवार) जुनी शुक्रवारी येथे महिला व पुरुषांनी मोठ्या प्रमाणात या सेवेचा लाभ घेतला. मोबाईल व्हॅनमध्ये अत्याधुनिक उपकरणांद्वारे नागरिकांची नेत्र व कर्णरोग तपासणी करण्यात आली. १ जूनपासून सुरू झालेल्या या सुविधेचा आतापर्यंत साडेपाचशेहून अधिक नागरिकांनी लाभ घेतला. तर दोनशेहून अधिक लोकांना अत्यल्प दरात चष्मा देण्यात आला. लभानतांडा, गायत्री नगर झोपडपट्टी, कुंभारपुरा नंदनवन, सोमवारी पेठ बाजार, गांधी पुतळा जुनी शुक्रवारी आदी ठिकाणी या मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून नागरिकांना ही सेवा मिळाली. रोज वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये ही व्हॅन पोहोचणार आहे. डॉ. श्रीरंग वराडपांडे, डॉ. गिरीश चरडे, डॉ. संजय लहाने आदी मंडळी संयोजनाची जबाबदारी पार पाडत आहेत.

निःशुल्क नेत्र व कर्ण रोग तपासणीला नागरिकांचा प्रतिसाद

निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया

नेत्ररोग तपासणीमध्ये ज्यांना मोतियाबिंदु आढळला आहे, त्यांच्या डोळ्यांवर शहरातील विविध रुग्णालयांमध्ये मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.

निःशुल्क मोतीबिंदू शस्त्रक्रिया

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article