नागपूर, २७ मे : केंद्रीय मंत्री मा. श्री. नितीन गडकरींवर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव झाला. त्यांच्या नागपूर येथील निवासस्थानी सकाळी आठपासून रात्री अकरापर्यंत त्यांना भेटणाऱ्यांची गर्दी होती. राजकीय क्षेत्रातील नेते व कार्यकर्त्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मा. गडकरी यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी केली.
मा. गडकरी यांना कुटुंबियांनी औक्षण केले. यावेळी कुटुंबातील सदस्यांसह नातेवाईकांची उपस्थिती होती. स्व. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या वतीने नेत्र व कर्ण तपासणीसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या रुग्णवाहिकांचे लोकार्पण ना. गडकरी यांच्या हस्ते झाले. दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्वसामान्य नागरिकांसह विविध क्षेत्रातील लोकांची तौबा गर्दी होती. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार कृपाल तुमाने, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, माजी मंत्री तसेच शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, आमदार कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, आमदार टेकचंद सावरकर, आमदार आशिष जयस्वाल, आमदार आकाश फुंडकर, माजी आमदार सुधाकर देशमुख, माजी आमदार डॉ. मिलींद माने, माजी आमदार परिणय फुके, माजी आमदार आशिष देशमुख यांच्यासह राजकीय क्षेत्रातील सर्वच पक्षांच्या नेत्यांनी यावेळी ना. गडकरी यांना प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्या. यासोबत वैद्यकीय, उद्योग, सांस्कृतिक, पत्रकारिता, सहकार अश्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.
कोट…
जनतेचे प्रेम हीच माझी खरी शक्ती आहे. या प्रेमामुळेच मला काम करण्याची प्रेरणा मिळते.
– मा. श्री. नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
चौकट…
राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून शुभेच्छा
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीश धनकड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, केंद्रीय महिला व बाल कल्याण मंत्री स्मृती इराणी, दिल्लीचे नायब राज्यपाल विनय कुमार सक्सेना, राजस्थानचे राज्यपाल कलराज मिश्रा, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधीपक्षनेते अजित पवार, खासदार सुनील तटकरे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर धामी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम के स्टॅलिन, गोव्याचे आरोग्य मंत्री विश्वजित प्रतापसिंग, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे, तेलगु देसम पार्टीचे प्रमुख चंद्राबाबू नायडू यांच्यासह केंद्रातील व विविध राज्यातील मंत्र्यांनी ना. गडकरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तर महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा, खासदार तसेच उद्योजक परिमल नाथवानी यांनीही ना. गडकरी यांना शुभेच्छा दिल्या.