ना. गडकरी यांनी घेतला पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा

ना. गडकरी यांनी घेतला पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा

नागपूर, दि. 26 मे : केंद्रीय मंत्री ना. श्री. नितीन गडकरी यांनी आज (शुक्रवार) नागपूर शहराच्या पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा घेतला. यासंदर्भात रविभवन येथे झालेल्या बैठकीत ओसीडब्ल्यू च्या कामातील त्रुटी सुधारण्याच्या सूचना करत पंधरा दिवसांच्या आत सद्यस्थिती अहवाल सादर करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले.

ना. गडकरी यांनी घेतला पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा

ना. गडकरी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीला आमदार श्री. कृष्णा खोपडे, श्री. प्रवीण दटके, श्री. मोहन मते, श्री. विकास कुंभारे, मनपा आयुक्त तसेच प्रशासक राधाकृष्णन बी., नासुप्रचे सभापती मनोजकुमार सूर्यवंशी, जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर, मनपा सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, ओसीडब्ल्यूचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितेश सिंग आदींची उपस्थिती होती. 

nitin gadkari

नागपूर शहराला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा, यादृष्टीने राबविण्यात येत असलेल्या योजनेची सध्या काय प्रगती आहे, यासंदर्भात ना. नितीन गडकरी यांनी जाणून घेतले. नागपूरकरांना पाणीपुरवठ्यासंदर्भात कुठलीही अडचण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेऊन कामातील त्रुटी दूर करण्याच्या सूचना त्यांनी ओसीडब्ल्यूला केल्या. कामे पूर्ण करण्यात कोणत्या अडचणी येत आहेत, किती पाण्याच्या टाक्या तयार झाल्या याची सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश ना. गडकरी यांनी दिले. यासोबतच पाणी पुरवठा यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी डेडलाईन निश्चित करून येत्या पंधरा दिवसांत सविस्तर अहवाल सादर करावा, अशा सूचना ओसीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना दिल्या. शहरासाठी मुबलक पाणी उपलब्ध असताना नागरिकांना पाण्याची अडचण जाणार नाही, याची पूर्ण दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देशही त्यांनी दिले.

ना. गडकरी यांनी घेतला पाणी पुरवठा यंत्रणेचा आढावा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *