नागपूर, दि. १५ एप्रिल – १९२७ साली अजनी उड्डाणपुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाचे काम करणाऱ्या ब्रिटिश कंपनीने मध्यंतरी हा पूल वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचा अहवाल दिला होता. त्यामुळे प्रशासनाकडून तो वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. मात्र, आता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या पुलाच्या जागी नवीन ६ पदरी पुलाचे काम होत असल्याने भविष्यात परिसरातील वाहतूक कोंडी सुटणार आहे. दरम्यान, केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाकडून ‘सीआरएफ’ फंडातून १६ हजार कोटी रुपये रेल ओवर ब्रिज आणि ‘आरओबी’साठी मंजूर करण्यात आल्याचे सांगत येत्या ५ वर्षांत राज्याला रेल्वे फाटक मुक्त करण्यासाठी राज्य सरकारला पूर्ण सहकार्य असल्याचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी यावेळी सांगितले.
नागपूर येथील अजनी येथे ९०४.४० कोटी रुपये किंमतीच्या १२ ‘आरओबी’ प्रकल्पांचे श्री गडकरीजी यांच्या हस्ते लोकार्पण व भूमिपूजन शनिवारी (दि. १५ एप्रिल) पार पडले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, मंत्री श्री रवींद्रजी चव्हाण, खासदार श्री कृपालजी तमाने, आमदार श्री कृष्णाजी खोपडे, आमदार श्री मोहनजी मते, श्री आशिषजी जयस्वाल, श्री राजूजी पारवे, आमदार श्री टेकचंद सावरकर, जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती मुक्ताताई कोपडे, माजी खासदार विकासजी महात्मे, माजी आमदार नागोजी गाणार, माजी आमदार सुधाकररावजी कोळे, माजी आमदार गिरीशजी व्यास यांच्यासह नगरसेवक, महाराष्ट्र रेल कॉर्पोरेशनचे अधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३५३ वरील नागपूर-नागभिड रेल्वे लाईनमध्ये ६-लेन, बोरगाव-खंडाळा ‘एमडीआर’वर २-लेन, नागपूर-कळमेश्वर राज्यमार्गावर २-लेन, आलागोंडी-बोरखेडी येथे २-लेन ‘आरओबी’ तसेच रेवरल-नांदगाव येथे २-लेन बो- स्ट्रिंग ‘आरओबी’ अशा एकूण ३०५ कोटी रुपये किंमतीच्या ६ प्रकल्पांचे लोकार्पण आज करण्यात आले. याशिवाय, अमरावती जिल्ह्यातील अमरावती-बडनेरा रोड, वडनेरा-अमरावती सेक्शनवर अमरावती निमभोर रोड, वर्धा जिल्ह्यातील अमरावती-नरखेड सेक्शनवर आर्वी रोड, यवतमाळ जिल्ह्यातील वणी-वरोरा रोड व माझरी ते पिंपळकुटी सेक्शनवर यवतमाळ रोड येथील एकूण २६६.४ कोटी रूपये किंमतीच्या ६ ‘आरओबी’, नागपूर येथील ३३३ कोटी रूपये किंमतीच्या २२० मीटर, ६-लेन अजनी रेल्वे केबल स्टेड ‘आरओबी’चे भूमिपूजनही करण्यात आले.
नागपूर शहर आणि जिह्यातील कामांना मंजुरी
श्री गडकरीजी म्हणाले, “नागपूर शहर आणि जिल्ह्यात ‘सीआरएफ’मधून ५०० कोटी रुपयांची नवीन कामे करण्यात येणार आहेत. त्यात झिरो माई येथे सबवे बांधकाम, महावीर प्लायवूड ते भेंडे लेआउटची सुधारणा, श्री राधे मंगल कार्यालय ते रिंगरोड आणि ऑरेंज सिटी हॉस्पिटल चौकापर्यंत रस्त्याचे सिमेंटीकरण, एअरपोर्ट ते एच.बी टाऊन इस्टेट रस्त्याचे सिमेंटीकरण, शताब्दी चौक ते मनीष नगर चौक रस्त्याचे सिमेंटीकरण, बोरगाव चौक ते गोरेवाडा रस्त्याचे सिमेंटीकरण, मंगलमूर्ती चौक ते जयताळा शेवटचा बस स्टॉप रस्त्याचे सिमेंटीकरण, चौधरी मेडिकल, झिंगाबाई टाकळी ते अवस्थीनगर चौक रस्त्याचे सिमेंटीकरण, शंकरपूर ते मिहान आणि चिंचभवन रस्त्याचे सिमेंटीकरण, सेनगाव ते बेला रस्त्याचे सिमेंटीकरण, बुटीबोरी ते उमरेड रस्त्याची सुधारणा, बेला ते ठाणा रस्त्याची सुधारणा, वाडी ते खडगाव प्राजिमा, रामकृष्ण सभागृह, चव्हाण पब्लिक स्कूल आणि लाव्हा अंगणवाडी रस्त्याचे सिमेंटीकरण, पालोरा ते सिंगोरी रस्त्याचे सिमेंटीकरण, दहेगाव ते इसापूर रस्त्यावर कन्हान नदीवर नवीन पूल या कामांचा समावेश आहे.”
महाराष्ट्रात १२ कोटी रुपये किंमतीचे नवीन २५ ‘आरओबी’
श्री गडकरीजी म्हणाले, “महाराष्ट्रात १२ कोटी रुपये किंमतीचे २५ ‘आरओबी’ नव्याने बांधण्यात येणार आहेत. यात उमरेड ते भिवापूर बायपास रोड (जि. नागपूर), जळगाव शहरातील बायपास सेक्शन, अमरावती-बडनेरा (जि. अमरावती), नागपूर ते इतवारी सेक्शन (जि. नागपूर), नागपूर ते इतवारी सेक्शनमधील डेप्युटी सिग्नल नागपूर रोड, बडनेरा-अमरावती सेक्शन अमरावती-निंभोर रोड (जि. अमरावती), अमरावती ते नरखेड सेक्शन येथील आर्वी रोड (जि. वर्धा), अमरावती ते नरखेड सेक्शन जलालखेडा रोड, अथनगाव ते तानशेट (हायड्रॉलिक ब्रिज), नाईक तलाव बांगलादेश ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन वैशाली नगर कलकत्ता लिंक रोड, दिघोरी ते इतवारी सेक्शन भांडेवाडी रोड (जि. नागपूर), भडगाव ते सांगली रोड (जि. सांगली), आसरा चौक ब्रिज सोलापूर वाडी सेक्शन (जि. सोलापूर), वणी वरोरा रोड (जि. यवतमाळ), अमरावती ते नरखेड सेक्शन चांदूर बाजार (जि. अमरावती), कोलवाडी ते रेवडी रोड (जि. सातारा), श्रीगोंदा ते वडगाव रोड (जि. अहमदनगर), माजरी ते पिंपळकुटी सेक्शन यवतमाळ रोड (जि. यवतमाळ), बडनेरा ते न्यू अमरावती आणि नरखेड सेक्शन येथील वरला (जि. अमरावती), ढोके उस्मानाबाद रोड (जि. उस्मानाबाद), दिवा ते वसई सेक्शन येथील तेवरी रोड (जि. ठाणे), कुरूडवाडी मिरज सेक्शन मधील पंढरपूर ते सांगोला रोड (जि. सोलापूर), जळम ते खानगाव सेक्शन (जि. बुलढाणा) आणि वर्धा रोडवरील मनीष नगर या कामांचा समावेश आहे. यातील ५ कामांचे आज भूमिपूजन झाले आहे.