आधार संस्थेच्या मदतीमुळे ५० दिव्यांगांचे जीवन सुसह्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १५ एप्रिल – “केवळ शारीरिक व्यंगामुळे समाजात इतर व्यक्तींप्रमाणे जगता येत नाही. त्यांनाही समाजाच्या प्रवाहात सहभागी होऊन सामान्य जीवन जगता यावे, यासाठी नागरिक म्हणून सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज आहे. सुमारे १५-१६ वर्षांपासून ‘डब्ल्यूसीएल’च्या सहकार्याने नागपूरमधील दिव्यांगांना कृत्रिम पाय वाटप करून त्यांच्या जीवनातील असहाय्यता दूर करण्याचे काम आधार संस्थेकडून करण्यात येत आहे. आजदेखील जवळपास ५० जणांना कृत्रिम पायांचे वाटप करण्यात आले आहे. यामुळे त्यांचे जीवन सुसह्य झाले आहे. कृत्रिम पाय वाटप करण्यात आलेल्या अनेकांनी दुचाकी चालून दाखवली. ही बाब आत्मविश्वास वाढवणारी आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

श्री गडकरीजी यांच्या प्रेरणेतून आधार अपंग सामाजिक संस्थेच्या वतीने नागपुरात दिव्यांगांना कृत्रिम पायांचे वाटप करण्यात आले. काँग्रेस नगर येथील विमलाबाई देशमुख हॉल येथे शनिवारी (दि. १५ एप्रिल) आयोजित कार्यक्रमात श्री गडकरीजी बोलत होते. यावेळी आधार संस्थेचे अध्यक्ष श्री सुमीतजी ताटे, ‘डब्लूसीएल’चे रिजनल मॅनेजर श्री वर्मा, प्राचार्य श्रीमती भारती खापेकर व इतर मान्यवर उपस्थित होते.

आधार संस्थेच्या मदतीमुळे ५० दिव्यांगांचे जीवन सुसह्य : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *