Search
Close this search box.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमुळे उत्तर नागपूरच्या वैभवात भर : केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

नागपूर, दि. १४ एप्रिल – “अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरमुळे एक चांगले सभागृह तसेच अनेक सुविधा असलेले केंद्र उत्तर नागपूरमधील लोकांसाठी उपलब्ध होणार आहे. भव्य पाच मजली इमारतीत असलेल्या माध्यम केंद्र, सार्वजनिक ग्रंथालय, ई-ग्रंथालयामुळे नागपूरकरांच्या सर्वांगीण विकासासाठी मदत होणार आहे. याशिवाय उत्तर नागपूरच्या वैभवात भरही पडणार आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

नागपूर येथे उभारण्यात आलेल्या अनेक सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर कन्व्हेन्शन सेंटरचे श्री गडकरीजी यांच्या हस्ते लोकार्पण झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी, महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष श्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार श्री डॉ. नितीन राऊत, आमदार श्री कृष्णा खोपडे, आमदार प्रवीण दटके, खासदार कृपाल तुमाने, माजी आमदार मिलींद माने, जोगेंद्र कवाडे, राजकुमार बडोले यांच्यासह लोकप्रतिनिधी व अधिकारी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “उत्तर नागपूरच्या विकासासाठी प्राधान्य असून त्यादृष्टीने अनेक विकास कामेदेखील सुरू आहेत. काम पूर्ण झालेल्या आणि नवीन होऊ घातलेल्या रिंगरोडमुळे वाहतुकीच्या समस्या सुटण्यासह या रस्त्याच्या बाजूला भविष्यात प्लॅन स्मार्ट सिटी विकसित झाल्यास उत्तर नागपूरच्या विकासात भर पडेल. जवळपास ५० टक्के नागपूर शहराला २४ तास पाणी उपलब्ध होत आहे. त्यामुळे नागपूरकरांची पाणी टंचाईतून मुक्तता झाली आहे. याशिवाय, ऑक्टोबरनंतर उत्तर नागपूरमध्ये बांधण्यात येत असलेल्या पाण्याच्या टाक्या पूर्ण करण्याचा प्रयत्न आहे. असे झाल्यास येथील नागरिकांना २४ तास पाणी उपलब्ध होऊ शकेल. तसेच, मुलांसाठी खेळाची मैदाने, जलतरण तलाव तयार झाल्यास मुलांमधील खेळाडू वृत्तीला प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे त्यादृष्टीने काम होण्याची आवश्यकता आहे. पिवळ्या नदीवरील पूल, एसटीपी प्लॅन, चार रेल्वे अंडर पास, पाच पावली उड्डाणपूल यामुळे शहरांतर्गत वाहतूक सुरळीत होणार आहे. शहरातील रस्ते सिमेंट काँक्रीटचे झाल्यास नागरिकांची खड्ड्यांपासून सुटका होणार आहे. ‘एनएचएआय’मधून मंजूर निधीमधून येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मार्केट उभारण्यात येणार आहे. त्यामुळे रस्त्यावर भरणारा बाजार बंद होणार आहे. अशा प्रकारे संपूर्ण नागपूरच्या समतोल विकासाच्या दृष्टीने अनेक उपाययोजना सध्या सुरू आहेत.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article