नागपूर, दि. २५ मार्च – पूर्ती सुपर बझारच्या नवीन लेडीज कॉटन कुर्ती, खेळणी आणि क्रॉकरी सेक्शनचा शुभारंभ केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते रिबिन कापून करण्यात आला आहे. नागपूर येथील बेसा रोडवरील पूर्ती सुपर बझार येथे शनिवारी (दि. २५ मार्च) मान्यवरांच्या उपस्थितीत हा शुभारंभाचा कार्यक्रम दिमाखात पार पडला. खास उन्हाळ्यासाठी एक्स्क्लुझिव कॉटन कुर्तीज, पॅन्ट्स, लखनवी चिकन कुर्ती व ओढणी असे विविध रंग आणि साईजमधील कपडे ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत. तसेच, विविध आकर्षक क्रॉकरी सेट व खेळण्यांची मोठी रेंजदेखील येथे उपलब्ध असणार आहे.