नागपूर, दि. २५ फेब्रुवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) नागपूर येथील खामला चौकातील जनसंपर्क कार्यालयात ‘जनसंपर्क’च्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते नागरिकांच्या समस्या व अडचणी जाणून घेणार आहेत. नागरिकांनी सकाळी ११ वाजता कार्यालयात समस्या आणि तक्रार अर्ज व संबंधित कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
नागपूरसह संपूर्ण राज्यातून नागरिक स्थानिक व राज्यस्तरावरील प्रश्न, केंद्र सरकारकडील विषय, रोजगार, अनुकंपा, आरोग्य, भरपाई, अनुदान, रस्तेबांधणी, राष्ट्रीय महामार्गाचे काम यासह अनेक विषयांची निवेदने घेऊन येतात. रविवारीदेखील श्री गडकरीजी ‘जनसंपर्क’च्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या, अडचणी जाणून घेऊन त्यावर मार्गदर्शन करण्यासह त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहेत. नागरिकांनी आवश्यक कागदपत्रे आणि निवेदन घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.