जगातील सर्वांत मोठ्या दिव्यांग पार्कचे केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते सोमवारी भूमिपूजन

नागपूर, १९ फेब्रुवारी – माननीय केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून जगातील सर्वांत मोठे दिव्यांग पार्क नागपूर येथे साकार होणार आहे. याचे भूमिपूजन सोमवारी (दि. २० फेब्रुवारी) श्री गडकरी जी यांच्या हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे उपमुख्यमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय श्री देवेन्द्रजी फडणवीस असणार आहेत. हा कार्यक्रम पारडी येथील सूर्यनगर येथे सकाळी ११ वाजता संपन्न होणार आहे.

देशातील वेगाने विकसित होणारे शहर अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये दिव्यांगांसाठी स्वतंत्र उद्यान असावे, अशी केंद्रीय मंत्री श्री गडकरीजी यांची संकल्पना होती. त्यानुसार ६६०० चौरस मीटर क्षेत्रफळावर आणि सुमारे १२ कोटी रुपये खर्चातून हे ‘अनुभूती इनक्लुजिव्ह पार्क’ विकसित होत आहे. केंद्र सरकारच्या सामाजिक न्‍याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सशक्तिकरण विभागाच्या सहकार्याने आणि नागपूर सुधार प्रन्यासतर्फे हे पार्क साकारण्यात येणार आहे. कार्यक्रमास महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्ष मा. श्री. चंद्रशेखर बावनकुळे, आमदार मा. श्री. प्रविण दटके, आमदार श्री. अभिजीत वंजारी, आमदार श्री सुधाकर अडबाले, आमदार डॉ. श्री नितीन राऊत, आमदार श्री कृष्णा खोपडे, आमदार श्री विकास कुंभारे, आमदार श्री मोहन मते, आमदार श्री विकास ठाकरे, नागपूर विभागीय आयुक्त श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी, मनपा आयुक्त श्री बी. राधाकृष्णन, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, नासुप्रचे विश्वस्त श्री संदीप इटकेलवार आदी मान्यवर उपस्थित असणार आहेत.

उद्यानाची वैशिष्ट्ये

या उद्यानात सेन्सरी गार्डन, ऑटिस्टिक मुलांसाठी ब्ल्यू रूम, टॅक्टाईल पाथवेज, टच अँड स्मेल गार्डन, ओपन जिम, खुले सभागृह, जगातील प्रसिद्ध दिव्यांगांनी केलेल्या कार्याचे दर्शन घडवणारे प्रदर्शन- हॉल ऑफ फेम, हायड्रोथेरपी पाँड, ब्रेल स्लेट, कँटीन आदी सुविधा असणार आहे. याशिवाय, दिव्यांगांनाही सामान्य मुलांप्रमाणेच खेळ व अन्य गोष्टींचा आनंद घेता येईल. त्यानुसार देखील येथे व्यवस्था असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *