नागपूर, १७ फेब्रुवारी – आदर्श शिक्षक स्व. प्रभाकर शामराव चेडगे यांचे १९ जानेवारी रोजी निधन झाले. महाल येथील नवयुग प्राथमिक शाळेत शुक्रवारी (दि.१७ फेब्रुवारी) त्यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी उपस्थित राहून स्व.चेडगे यांना श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी श्री यशवंत खारपाटे होते. शिक्षक म्हणून कार्यरत असताना स्व.चेडगे यांचे जीवन अतिशय व्रतस्थ राहिले आहे. त्यांच्या माध्यमातून अनेक विद्यार्थी घडले. यावेळी विविध संस्था आणि संघटनांनी स्व. प्रभाकर चेगडे यांना श्रद्धांजली अर्पण केली.