Search
Close this search box.

दूध उत्पादन वाढीसाठी आयव्हीएफ तंत्रज्ञान फायदेशीर – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी

भिलवडी (जि. सांगली), दि. २७ जानेवारी – “आज बाहेरील देशात मिल्क पावडरला खूप मागणी आहे. मात्र, आपण ही गरज भागवू शकत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याकडे कमी होणारे दुधाचे उत्पादन आणि त्यामुळे वाढलेल्या किंमती यामुळे मागणीवर परिणाम होतो. यामुळे दुधाचे उत्पादन वाढून किमती कशा कमी करता येतील, यावर विचार होण्याची गरज आहे. एम्ब्रियो ट्रान्सफर व आयव्हीएफ तंत्रज्ञानामुळे दुधाचे उत्पादन वाढण्यास मदत होऊ शकेल. याआधारे २५ ते ३० लिटर दूध देणारे पशु उपलब्ध झाल्यास हा प्रश्न काही प्रमाणात सुटेल. आपल्याकडे चितळे डेअरीने या क्षेत्रात पाऊल टाकल्याने याचा शेतकऱ्यांसाठी खूप फायदा होऊ होईल,” असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथील ‘चितळे जीनस एबीएस’ यांच्यातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषिमंत्री आणि खासदार श्री शरद पवार होते. यावेळी सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री श्री सुरेश खाडे, खासदार श्री संजयकाका पाटील, माजी मंत्री व आमदार श्री जयंतराव पाटील, आमदार डॉ. श्री विश्वजित कदम, श्री धनंजय गाडगीळ, श्री मोहनराव कदम यांच्यासह चितळे समुहाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

श्री गडकरीजी म्हणाले, “देशाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा केवळ १२ टक्के वाटा आहे. ग्रामीण भागात रोजगार, शिक्षण तसेच जीवनावश्यक गोष्टींचा अभाव असल्याने तेथून शहराकडे मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. त्यामुळे शहरे वाढत असून ग्रामीण भाग ओस पडत चालला आहे. त्यामुळे कृषी क्षेत्राचा विकास करून हे स्थलांतर थांबवायचे असल्यास हा वाटा २४ टक्क्यांपर्यंत जाण्याची आवश्यकता आहे. याशिवाय, कृषी मालाची उत्पादकता आणि ऍग्रो प्रोसेसिंग इंडस्ट्रीजलादेखील प्रोत्साहन देण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात नवनवीन संशोधनासह खर्च कमी करून उत्पन्न वाढवण्यार भर देणे गरजेचे आहे. त्याला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिल्यास हे साध्य करणे अवघड नाही. याशिवाय, कृषिमाल बाहेरील देशाला निर्यात झाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article