नागपूर, दि. २० जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या संकल्पनेतून स्थानिक खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन तसेच व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गडकरीजी यांनी शुक्रवारी (दि. २० जानेवारी) कपिल नगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल मैदानावर सुरू असलेल्या फुटबॉल सामनास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांचे खासदार क्रीडा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. श्री गडकरीजी यांनी स्पर्धकांसोबत संवाद साधत त्यांचा उत्साह वाढवला.