नागपूर, दि. २० जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गडकरीजी यांनी शुक्रवारी (दि. २० जानेवारी) गांधीबाग उद्यान मैदानावर सुरू असलेल्या बॉक्सिंग स्पर्धास्थळी भेट दिली.
यावेळी श्री गडकरीजी यांनी स्पर्धेदरम्यान उपस्थितांशी व खेळाडूंशी संवाद साधला व त्यांचा उत्साह वाढवला. या महोत्सवाच्या माध्यमातून खेळाडूंच्या प्रतिभेला प्रोत्साहन मिळणार आहे. पुढे जाऊन ते राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या प्रतिभेचे दर्शन घडवतील. याशिवाय, ऑलम्पिकपर्यंत जाऊन नागपूरसह देशाचेही नाव पुढे नेतील.