नागपूर, दि. १९ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून नागपूर येथे दि. ८ ते २२ जानेवारीदरम्यान ‘खासदार क्रीडा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. श्री गडकरीजी यांनी गुरुवारी (दि. १९ जानेवारी) बजाजनगर येथील बास्केटबॉल मैदान आणि बॉक्स क्रिकेट स्पर्धास्थळी भेट दिली.
यावेळी त्यांचे खासदार क्रीडा महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांकडून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. दरम्यान, श्री गडकरीजी यांनी खेळाडूंसोबत बास्केटबॉल खेळण्याचा आनंद घेतला व खेळाडूंचा उत्साह वाढवला.