नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज शहरातील जैन कलार समाज भवन, रेशीमबाग चौक येथे ज्युडो कराटे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. केंद्रीय मंत्री श्री नितीनजी गडकरी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली.
श्री नितीनजी गडकरी यांनी या वेळी स्पर्धेतील खेळाडूंशी संवाद साधला व त्यांचा उत्साह वाढवला. स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना बक्षीस देऊन त्यांचा गौरव कला.