नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये सुरू असलेल्या खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज धंतोली येथील यशवंत स्टेडियमवर महिलांसाठी आयोजित क्रीडा स्पर्धांना श्री नितीनजी गडकरी यांनी भेट दिली. या वेळी सुप्रसिद्ध गायिका अनुराधा पौडवाल देखील उपस्थित होत्या.
सुप्रसिद्ध गायिका अनुराधाजी पौडवाल यांच्या उपस्थितीने महिला खेळाडूंचा उत्साह वाढला. स्पर्धेसाठी उपस्थित भगिनी व नागरिकांशी या वेळी श्री गडकरीजी व अनुराधा पौडवला यांनी संवाद साधला. त्यांना मार्गदर्शन केले तसेच त्यांना प्रोत्साहन देत त्यांचा उत्साह वाढवला.