नागपूर, दि. १५ जानेवारी – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांच्या प्रेरणेतून नागपूरमध्ये ८ ते २२ जानेवारी दरम्यान आयोजित खासदार क्रीडा महोत्सवांतर्गत आज शहरातील रेशीमबाग मैदान येथे शरीर सौष्ठव (Bodybuilding) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. श्री नितीनजी गडकरी यांनी स्पर्धास्थळी भेट दिली.
या वेळी श्री गडकरीजी यांनी स्पर्धकांशी संवाद साधला. स्पर्धेत विजयी झालेल्या खेळाडूंना गडकरीजी यांच्या हस्ते पदक वितरीत करून त्यांचा गौरव करण्यात आला.