Search
Close this search box.

कृषी शक्ती शेतकऱ्यांसाठी ठरू शकते वरदान – केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी

नागपूर, २५ नोव्हेंबर – “नॉलेज ही एक पॉवर आहे आणि ॲग्रीकल्चर नॉलेज ही कृषी शक्ती आहे. त्यामुळे ही शक्ती प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात पोहोचणे गरजेचे आहे. ज्यामुळे या ज्ञानाचा वापर करून शेतकरी समृद्ध आणि संपन्न होईल. तसेच काही प्रमाणात शेतकरी आत्महत्याही थांबतील,” अशी भावना केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी यांनी व्यक्त केली.

नागपूर येथील पंजाबराव कृषी विद्यापीठ ग्राउंड, दाभा येथे ‘ॲग्रोव्हिजन – २०२२’ कृषी प्रदर्शनाअंतर्गत आयोजित ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते.

केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी जी म्हणाले, “शेतकऱ्यांना उसाची शेती सर्वात फायद्याची ठरते. अतिवृष्टीचाही या पिकाला फटका बसत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा ओघ या पिकाच्या लागवडीकडे जास्त असतो. मात्र, उत्पादकांनी त्यांचा ऊस साखर उत्पादनासोबतच इथेनॉल निर्मितीसाठी दिल्यास तेदेखील फायद्याचे ठरणारे आहे. कारण साखर उत्पादन केल्यानंतरही त्याच्या विक्रीसाठी वर्षभर वाट पहावी लागते, मात्र इथेनॉलचे पैसे २२ दिवसांत हातात येतात. त्यामुळे एकेरी उत्पन्न वाढण्यासोबतच लवकर पैसे हाती येण्यास हे फायदेशीर ठरू शकते. याचाही विचार व्हायला हवा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Articles You Might Like

Share This Article