नागपूर, ६ नोव्हेंबर – गुरुनानक दरबार कमिटीद्वारे आयोजित नगर कीर्तन शोभायात्रेत केंद्रीय मंत्री श्री नितीन गडकरी यांनी सहभागी होत उपस्थित शीख बांधवांना संबोधित केले.
नागपूर येथील व्हेरायटी चौक येथून सुरू झालेल्या या शोभायात्रेचा रामदास पेठ गुरुद्वारा येथे समारोप झाला. यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
“भारताचा इतिहास आणि संस्कृती खूप मोठी असून मानवकल्याण आणि विश्व कल्याणाचा संदेश आपल्या महान संतांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या देशाच्या सुरक्षा, एकता आणि अखंडतेसाठी शीख समुदायाने मोठे योगदान दिले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी शीख समुदायाने जी किंमत चुकवली आहे, ती आम्ही कधीच विसरू शकत नाही. गुरुनानक देवजी यांनी दिलेल्या शिकवणीवर आजही श्रद्धा आणि विश्वास ठेवून आजही संस्कृतीचे जतन शीख समुदायाकडून चांगल्या पद्धतीने होत आहे,” असे प्रतिपादन श्री गडकरी जी यांनी केले.